जळगावातील जाणता राजा नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जाणता राजा नगर परिसरातून बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राची हेमराज भावसार (वय-४८, रा. जाणता राजा नगर, कोल्हे हिल परिसर, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ फेब्रुवारी रात्री ११ ते ८ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे.