जळगाव ;- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भाजीपाला घेण्यासाठी लावलेली रिक्षा चोरणाऱ्या दोन चोरट्याने एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून शाहरुख जहुर खाटीक (तांबापुरा) आणि फारुख शेख मुस्तफा (रजा कॉलनी) अशी संशयित चोरटयांची नवे आहेत.
गोपाल युवराज चौधरी हे रिक्षाचालक असून ते ६ मार्च २०२१ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या रिक्षाने (एमएच १९ व्ही३६८८) भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची रिक्षा भाजी मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहीणी स्वीट मार्टच्या बाजूला उभी केली होती. भाजीपाला घेऊन बाहेर आल्यावर रिक्षा चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला होता.हि रिक्षा शाहरुख खाटीक आणि फारुख शेख मुस्तफा या दोघांनी चोरली असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी दोघांना १ जुलै रोजी शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांंच्याकडून चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सहायक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, योगेश बारी, इमरान सय्यद, जमीर शेख आदींनी हि कारवाई केली .