बोदवड येथील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : शहरातील जामठी रस्त्यावरील ‘क’ वर्गाच्या कनिष्ठ न्यायालयात चोरी झाल्याची घटना दिनांक ७ रोजी उघडकीस आली. यात ३८ हजारांचे साहित्य चोरीस गेले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या लिपिक कक्षातून ३० हजार रुपये किमतीचे संगणक व ८ हजार रुपये किमतीचे प्रिंटर असे एकूण ३८ हजार रुपयांचे साहित्य दिनांक ६ रोजी रात्री १० ते दिनांक ७ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले आहे. घटनास्थळी जिल्हा मुख्य न्यायाधीश एम. एस. बढे यांनी भेट दिली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
याबाबत न्यायालयाचे सहायक अधीक्षक वैभव केशव तरटे (५६,रा. बोदवड) यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अ, ३३१, (४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.