मृत्यूचे कारण अस्पाष्ट ; गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
चोपडा :- टापयपिंगची परिक्षा देण्यासाठी मालेगाव येथे गेलेला कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय २७, रा. चहार्डी, ता. चोपडा) हा तरुण दि. १९ पासून बेपत्ता होता. त्याने मालेगाव येथे दि. २२ जून रोजी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्याच्यावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील हा तरुण दि. १९ रोजी मालेगाव येथे टायपिंग परीक्षा देण्यासाठी गेलेला होता. पेपर दिल्यानंतर कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, मात्र तो होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर दि २० रोजी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. दरम्यान, शनिवार दि.२२ रोजी मालेगाव येथील छावणी पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कामगारांना गळफास घेतलेल्या युवकाचा मृतदेह असल्याचे आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मयताची ओळख पटवली असून तो तीन दिवसांपासून बेतपत होता. त्यानंतर पंचनामा करून शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
राज्यसेवेच्या मुख्य परिक्षेची करीत होता तयारी कुलदीप पाटील याने बारामती येथून कृषीमध्ये पदवी घेतली होती. त्यानंतर तो स्पर्धा परीक्षा देत होता त्यात त्याला यश देखील मिळत होते. यात तो राज्य सेवेची पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेची तयारी करत होता. त्यात मालेगाव येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या टायपिंगची परीक्षा देण्यासाठी गेला होता परंतु दुर्दैवाने त्याने गळफास घेत आपले जीवन संपवल्याने चहार्डी परिसरात भावी अधिकारी गमवल्याची भावना व्यक्त होऊन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.