चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संचालकापैकी सर्वानुमते जेष्ठ संचालक मुरलिधर बाविस्कर रा.पुनगाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चोपडा कृ.उ.बा.समितीमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस, भाजपा, तसेच मा.आ.कैलासबापू पाटील गटाची सत्ता आहे,मा.उपसभापती नंदकिशोर भानुदास पाटील यांनी राजिनामा दिल्यामुळे आज दि.5 आॅगस्ट 2021 रोजी भाजपाचे जिल्हा अनुसूचित जमाती अध्यक्ष मगन बाविस्कर यांचे वडील मुरलिधर बाविस्कर यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष जेष्टनेते अरुणभाई गुजराती, मा.आमदार कैलासबापू पाटील,मा.सभापती आत्माराम म्हाळके,जेष्ठनेते शांताराम आबा पाटील, नाशिक विभाग ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रदिप पाटील,भाजपा लुकाध्यक्ष पंकजदादा पाटील,चोपडा कृ.उ.बा.समिती सभापती दिनकर पाटील, मा.सभापती गिरीशआप्पा पाटील, नारायणदादा पाटील,पं.स.सभापती सौ.प्रतिभा बापूराव पाटील,उपसभापती सुर्यकांत खैरनार,मा.उपसभापती नंदकिशोर पाटील,भूषणदादा भिल,संचालक भरतदादा पाटील,धनंजय पाटील, हनुमंतराव महाजन,यशवंतबापू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राकेशदादा पाटील, भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील
बापूराव पाटील, आदर्श गाव हातेड बु.सरपंच डाॅ.विक्कीदादा सनेर,शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे,युवामोर्चा शहर अध्यक्ष तुषार पाठक पुनगावचे सरपंच किशोर बाविस्कर,विजय बाविस्कर,दिपक पाटील आदि संचालक,पं.स.सदस्या,पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी या निवडी प्रसंगी उपस्थिती देवून अभिनंदन केले आहे.