चोपडा ;- चोपडा येथील तारामती नगर भागातील १६ वर्षीय तरुणी कु. मनीषा अनिल भोई हिने 7 फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना घडली आहे .
दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास हा प्रकार कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले , सी एम ओ डॉ सुरेश पाटील यांनी तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .
डॉ सुरेश पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला खबर दिली की , कु. मनीषा अनिल भोई वय वर्ष 16 रा. तारामती नगर हिने राहत्या घरात गळफास घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून पाहिले असता तिला मृत घोषित केले. सदर घटनेची चोपडा शहर पोलीस स्टेशनला 11 / 2021 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना मधुकर पवार अधिक तपास करीत आहे …







