• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

हायड्रोसेफॅलसवरील तज्ज्ञ न्युरोसर्जनकडून शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : अवघ्या चार महिन्यांचे बाळ, सततचे रडणे, अस्वस्थता आणि झटक्यांमुळे चिंतेत पडलेले पालक… अशा परिस्थितीत योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांमुळे जळगाव जिल्हयातील बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
बाळाला मागील १५ दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होत होता. त्यासोबतच बाळ सतत रडत होते, अस्वस्थ राहत होते आणि त्याला झटके येत होते. अवघ्या चार महिन्यांच्या बाळामध्ये अशी लक्षणे दिसल्याने पालकांची चिंता वाढली. त्यानंतर बाळाला उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय तपासण्यांनंतर बाळाला हायड्रोसेफॅलस असल्याचे निदान झाले. हायड्रोसेफॅलस म्हणजे मेंदूतील पोकळ्यांमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड या द्रवाचे प्रमाण वाढणे. त्यामुळे मेंदूवरील दाब वाढून लहान बालकांमध्ये सतत रडणे, चिडचिड, उलट्या, डोक्याचा आकार वाढणे आणि झटके येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
न्यूरोसर्जरी विभागाकडून आव्हानात्मक शस्त्रक्रिया आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाच्या तज्ज्ञ पथकाने बाळावर तझ डॉ. अनिकेत पाटील यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूतील अतिरिक्त द्रव एका विशेष नळीच्या साहाय्याने पोटाच्या पोकळीत सोडला जातो. त्यामुळे मेंदूतील द्रवाचा निचरा होण्यास आणि मेंदूवरील अतिरिक्त दाब नियंत्रित करण्यास मदत होते.अवघ्या चार महिन्यांच्या बालकावर अशी शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत काळजीपूर्वक नियोजन आणि कौशल्याचे काम असते. शस्त्रक्रियेदरम्यान तसेच त्यानंतर बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते.
बालरोग विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पुढील उपचारांची आणि प्रकृतीच्या निरीक्षणाची जबाबदारी बालरोग विभागाने सांभाळली. बाळाचे श्वसन, तापमान, दूध पिण्याची क्षमता, झटक्यांची स्थिती आणि शंटशी संबंधित संभाव्य गुंतागुंत यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. न्यूरोसर्जरी आणि बालरोग विभागाच्या समन्वयातून बाळाला आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
एकाच छताखाली प्रगत उपचार सुविधा- डॉ. अनिकेत पाटील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात न्यूरोसर्जरी, बालरोग विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग आणि बाल अतिदक्षता विभाग यांच्या माध्यमातून बालकांच्या गंभीर आजारांवर आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.लहान बालकांमध्ये सतत रडणे, असामान्य चिडचिड, वारंवार उलट्या किंवा झटके अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खडसे कुटुंबाचे स्वीय सहाय्य्क योगेश कोलते मैदानात

Next Post

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon