अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील मालेगाव रोड येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घरात घुसून सोन्याचे, चांदीचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकुण ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी दि.३० मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयालक्ष्मी शंकरलाल खरटमल (वय ५६ रा. मालेगाव रोड, चाळीसगाव) या महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. दि. २९ मे रोजी रात्री ११.३० वाजता त्या घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकुण ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ३० मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी १ वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.