दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, ७ जणांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) : – चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत वाकगावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करुन तीची वाहतुक करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गिरणा नदी पात्रात धडक कारवाई करीत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये वाळूने भरलेले टाटा कंपनीचे ०५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ट्राली, ०२ जेसीबी असा एकुण १ कोटी ५४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी संदीप मुरलीधर पाटील (वय ४१ रा. वडगांव सतीचे, ता भडगाव), अक्षय देवीदास मालचे (वय -२० रा. खालची पेठ, भडगांव), प्रविण विजय मोरे (वय २० रा. वरची पेठ भडगाव), मच्छिद्र गिरधर ठाकरे (वय २१), ललीत रामा जाधव (वय-२२ रा. यशवंती नगर, भडगाव), शुभम सुनिल भिल (वय २१, यशवंत नगर, भडगाव), रणजीत भास्कर पाटील (रा महींदळे, भडगाव) असे मिळून आले. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही रवी पवार उर्फ रवी पंचर रा भडगांव याचे सांगणेवरुन वाळु चोरी करत आहोत असे पोलीस पथकाला सांगितले.
सर्व संशयित आरोपींना व वाहनाना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द पोकॉ राहुल राजेंद्र महाजन यांनी दिलेली फिर्यादवरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील मुख्य संशयित आरोपी रवि पंचरवाला याचा शोध घेणे चालु आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार देवरे, पोना राजेंद्र निकम, पोहेकों भगवान पाटील, पोकॉ. विकास पाटील, पोकों विश्वास देवरे, महेश बागुल, पोकों चेतन राजपुत, पोकों सुनिल मोरे, पोकॉ. श्रीराम कांगणे, पोकों समाधान पाटील, पोकों राहुल महाजन, पोकों सुदर्शन घुले अशा पथकाने केली.