भुसावळ शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) : शहराजवळील कंडारी येथील घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी बॅटरी चोरीस नेली होती. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन्ही संशयित आरोपीचा उलगडा झाला. दोघांना अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी मोहम्मद आसिफ (२४, रा. आगवाली चाळ, भुसावळ) व सिकंदर तडवी (२०, रा. कवाडेनगर, भुसावळ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बॅटरी व वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. नीलेश मुरलीधर मोरे (रा. कंडारी) यांच्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी दि. ५ सप्टेंबर रोजी बॅटरी चोरीस नेली होती. त्यांनी दि. १३ रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी भेट दिली होती.
घटना घडल्यापासून तपासचक्र फिरत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने अखेर संशयित चोरटे हे पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोहेका संदीप पालवे, पोना जाकीर मंसुरी, अब्दुल रज्जाक, पोहेका राहुल भोई यांच्या पथकाने आरोपीस वाहन व बॅटरी ताब्यात घेतले.