जयपूर : संपूर्ण भारतात कोरोनाचा हैदोस सुरु असताना क्रिकेट विश्वालाही कोरोनाने हादरा दिलाय. राजस्थानचा माजी लेगस्पिनर आणि रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव या उमद्या खेळाडूला कोरोनाने हिरावून नेलंय. 36 वर्षी विवेक यादव कोरोनाशी दोन हात करत होता परंतु त्याच्या लढाईला यश आलं नाही. कोरोनाविरुद्धची मॅच अखेर त्याने हरली. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.