जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ओंकार नगरातून महिलच्या घराच्या कंपाऊंडमधून पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी दि. १९ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील ओंकार नगरात वंदना अजय चौधरी (वय ५९) या महिला वास्तव्याला आहे. दि. १५ ते १९ मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडमधून पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार लावलेली होती. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही ईलेक्ट्रीक पाण्याची मोटार चोरून दि. १० मे रोजी सकाळी ७ वाजता वंदना चौधरी या महिला घरी आल्या तेव्हा चोरी झाल्याचे समजले.
सोमवारी दि. २० मे रोजी दुपारी दीड वाजता महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.