चाळीसगाव : -भरधाव वेगाने कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर लागल्याने आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर वाघळी ते बोरखेडा दरम्यान मुधोई देवी मंदिराजवळ घडली. बेबाबाई सुधाकर महाजन (५२) असे मृत महिलेचे नाव आहे.
हिंगोणेसीम येथील बेबाबाई या मुलगा सचिन याच्याबरोबर चाळीसगाव येथे आल्या होत्या. परत जात असताना त्यांच्या दुचाकीला ( एम.एच.१९ डीएम ७५१०) कार क्रमांक (एम.एच.०४.एच.एस. ४५००) ने जोरदार धडक दिली. त्यात बेबाबाई महाजन यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर सचिन याच्या तोंडाला, हाताला मार लागला. दोघांना रुग्णालयात दाखल केले. त्यात बेबाबाई महाजन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.