भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील बुध्द विहार परिसरात राहणाऱ्या तरूणाच्या अंगावर कुलर पडल्याने वीजेचा शॉक लावून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर विनोद परदेशी (वय-२३, रा. जैतवन बुद्ध विहार जवळ भुसावळ ) असे मृत तरूणाचे नाव आहे.
किशोर विनोद परदेशी हा तरूण परिवारासह भुसावळ शहरातील बुध्द विहार परिसरात राहायला आहे. रविवारी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास किशोर परदेशी हा घरी घरी उभा असताना त्याच्या अंगावर कुलर पडले. त्यामुळे त्याला विजेच्या जोरदार झटका लागला. त्यातच तो बेशुध्द झाला. ही घटना घडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.