जळगाव ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील दापोरी खुर्द येथे तापी नदी पात्रात बालकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृत्युमुखी पडलेला रोशन युवराज सोनवणे (वय ९) निंभोरा (ता. धरणगाव) येथील रहिवासी होता


रोशन मुंगसे येथील जि.प.शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेला त्यावेळी पाण्यात पाय घसरल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. चोपडा येथे रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निंभोरा येथे रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई वडील, तीन बहिणी, आजी-आजोबा असा परिवार आहे.







