एमएचटी-सीईटी/जेईई/निट विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
जळगाव, (प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात एमएचटी—सीईटी/जेईई/निट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले करण्यात आले असून कृषी क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची ही उत्तम संधी आहे.
कृषी क्षेत्रात संशोधन, उद्योजकता, कृषी अधिकारी, कृषी सल्लागार, अॅग्री-बिझनेस, बँकिंग, कृषी उद्योग आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असल्याने बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअरचा मजबूत पाया ठरणार आहे. महाविद्यालयाचा कोड क्रमांक १११३७ असून कृषी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे सक्षम कृषी पदवीधर घडविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. संस्थापक व अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीतच उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सूरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ९७१४९ ४७१३१ डॉ शैलेश तायडे किंवा महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.