बोदवड (प्रतिनिधी) : तालुक्यातील फरकांडे मारुती येथील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानसिंग गुलाब बारेला (वय 30, रा. फरकांडे मारुती, ता. बोदवड) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना खाली उतरविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू क्रमांक 27/2026 नुसार नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.









