जळगाव (प्रतिनिधी) :- बी.यू.एन. रायसोनी स्कूल सी.बी.एस.ई पॅटर्न प्रेमनगर येथे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब उत्तमचंद रायसोनी यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्त दि. १४ रोजी कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. तसेच सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना व भाऊसाहेब उत्तमचंद रायसोनी यांना आदरांजली वाहन्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व पालन पोषणासाठी आई वडील व वडीलधाऱ्यांना जे परिश्रम घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात त्यांचे ऋण फेडण्यासाठी व विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी शाळा प्रशासनाकडून हा ऋणनिर्देश दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत वडिलधाऱ्यांचा आदर करण्याचा संकल्प केला. तसेच माता पिता वडीलधाऱ्यांचे पूजन करून पालकांविषयी मन:पूर्वक ऋण व्यक्त केले.