दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे खलबते सुरु
जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नसून महायुतीचा आकडा देखील घसरला आहे. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते संघटनेत काम करण्यास तयार झाले असून राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या जागी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत याबाबत वरिष्ठांकडे चर्चा सुरु आहे. महाजन यांच्याकडे गृह खातेही देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने मोठा फडका बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली. फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत जळगावच्या दोन्ही खासदारांसह गिरीश महाजन देखील उपस्थित आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांचेकडे दिली जाणार असल्याची माहीती आहे. संकटमोचक म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक संकट काळात पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.तसेच, फडणवीस यांच्याकडे असणारे गृह खाते देखील गिरीश महाजन यांच्याकडे येऊ शकते.