भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ महिला मंडळ आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन संतोषीमाता हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेस जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगांव यांचे सहकार्य लाभले .
खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात खामगावचा ऋषिकेश लोखंडेकर व चंद्रशेखर देशमुख यांनी बरोबरी साधत ऋषिकेश प्रथम क्रमांक पटकावला.
तर मलकापूरचा ओम पाटील वरणगाव फॅक्टरी चा किशोर रील यांचा पराभव करीत दुसरा क्रमांक पटकावला.या स्पर्धेत एकूण १६० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता त्यात भुसावळसह, जळगाव, खामगाव, नंदुरबार, मलकापूर,नाशिक,ठाणे, बुलढाणा येथील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत एकूण विशेष म्हणजे १८ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडूंचा सहभाग होता.
स्पर्धा स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या पाच हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली उत्तेजनार्थ वय वर्षे नऊ व पंधरा वर्षे वयोगटातील खेळाडूंना प्रत्येकी तीन खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले तसेच बेस्ट बेस्ट भुसावल किंग व क्वीन म्हणून खेळाडूंना गौरवण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता संपन्न झाले यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरती चौधरी, सचिव सौ. लता होसकोटे, उपाध्यक्ष स्वाती नाईक,खजिनदार सौ,जयश्री ओक, प्रोजेक्ट चेअरमन सौ वैशाली भगत हे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – खुला गट , प्रथम क्रमांक ऋषिकेश लोखंडकर ६.५ गुण खामगाव,११०० रुपये, द्वितीय ओम पाटील ६.५ गुण मलकापूर, ८०० रुपये, तृतीय चंद्रशेखर देशमुख जळगांव६ गुण, चवथा क्रमांक गुणवंत कासार जळगांव६ गुण, पाचवा ओम चौधरी नाशिक ६ गुण ,सहावा मिलींद शिरोडे ६ गुण वरणगाव फॅक्टरी,सातवा दयानंद शेंडे जळगांव ६ गुण,आठवा रियाज तडवी भुसावळ ५.५गुण नववा क्रमांक मंथन निमोणकर धुळे ५.५ गुण, दहावा क्रमांक अनिकेत शिरोडे वरणगाव फॅक्टरी ५.५ गुण पहिल्या दहा खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली तर वयोगटातील पंधरा वर्षातील गटात प्रथम क्रमांक खुशबू कोकणे धुळे ५ गुण द्वितीय उज्वला आमले जळगाव ५ गुण तिसरा क्रमांक अमळनेरचा मितेश जेठवा ४.५ गुण यांनी चषक पटकाविला.९ वर्षाआतील गटात प्रथम क्रमांक सुकृत पाठक पाचोरा, द्वितीय अजय पाटील जळगाव, तृतीय गौरव बोरसे जळगाव यांनी पटकावला(सर्व ४ गुण) बेस्ट भुसावल किंग म्हणून दर्पण दुबे पाच गुण भुसावळ क्वीन बोपाराय गुर्मीत कौर ५ गुण यांनी बक्षीस मिळविले.स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे परेश देशपांडे व भरत आमले यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची राणे यांनी केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरणाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनघा चोपडे, सौ.रजनी सावकारे महानंदा पाटील, महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा सौ आरती चौधरी, वैशाली भगत, लता होसकाटे यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी महिला मंडळाच्या सदस्य प्रगती ओक, सौ प्रमिला नेमाडे, सौ राजश्री कात्यायानी, सौ अनिता कवडीवाले,सौ. किरण चौधरी, सौ मंगला पाटील, सौ.लता ढाके,सौ.संगीता मुजुमदार, सौ.भारती चव्हाण,चारू महाजन, माधुरी गुजर, माधुरी गव्हाळे, सुनिता पाचपांडे, विणा ठाकूर हे उपस्थित होते.