महावितरणच्या उपक्रमाला प्रतिसाद
भुसावळ (प्रतिनिधी) – तत्काळ वीज जोडणी उपक्रमांर्गत महावितरणच्या भुसावळ विभागात अवघ्या चोवीस तासात तब्बल ५० नवीन वीजग्राहकांना जोडण्या देण्यात आल्या.
भुसावळ ग्रामीण उपविभागातील मोतीराम नगर व परिसरातील गावांतील सुमारे ५० नवीन वीज ग्राहकांना तात्काळ जोडण्या देण्यात आल्या. मोतीराम नगर येथील वीस ग्राहक विजेच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झाले होते. त्यांच्याशीही संवाद साधून त्यांच्याकडील थकबाकी भरुन घेऊन त्यांचाही वीजपुरवठा जोडण्यात आला. भुसावळ विभागातील कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, सहाय्यक अभियंता कविता सोनवणे, कर्मचारी प्रकाश तायडे, गोकुळ पाटील, कैलास सुरवाडे यांचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी तत्काळ सेवेबद्दल यांनी अभिनंदन केले. ग्राहकास दिलेल्या सेवेबद्दल सरपंच मोहम्मद गवळी, मासूम गवळी व इतर ग्रामस्थांनीही महावितरणच्या कामाचे कौतुक केले.