• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात मध्यरात्री थरार! जुन्या वादातून नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गोळीबार; शहरात टोळीयुद्ध भडकण्याची भीती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

दंगल पुलाजवळ दोन राऊंड फायर; दोन कुप्रसिद्ध संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेवरील जुन्या व्यवसायाच्या वादातून एका ३० वर्षीय तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराच्या या आवाजाने आणि हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील राहुल नगरात राहणारे आणि भुसावळ नगरपालिकेत नोकरीस असलेले धरमसिंग ऊर्फ गोलू रायसिंग पंडित (वय ३०) हे ६ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी असलेल्या ‘वैभवी ट्रेडर्स’ दुकानाच्या ओट्यावर बसलेले होते.

याच वेळी दंगल पुलाकडून मोटारसायकलवर दोन जण आले. जुन्या रेल्वेवरील व्यवसायाच्या वादाचा राग मनात धरून, मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी धरमसिंग यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गाठले.

मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या अनिकेत जाधव याने त्याच्या जवळील पिस्तूल काढून थेट धरमसिंग यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे धरमसिंग यांनी प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत तिथून पळ काढला.

याप्रकरणी फिर्यादी धरमसिंग ऊर्फ गोलू रायसिंग पंडित यांनी ७ जुलै रोजी दुपारी ३.१३ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून: १) अमोल विनोद देवरे (रा. रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) २) अनिकेत ऊर्फ कालु मनोज जाधव (रा. वाल्मिकी नगर, भुसावळ) या दोघांविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३३६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ३५२, ३५१(२)(३), ३(५) सह शस्त्र अधिनियम (आर्म्स ऍक्ट) कलम ३/२५, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदारे बारबोले यांनी ७ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे आणि घटनास्थळाला भेट देऊन तपासाची पाहणी केली.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) राहुल तायडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार; पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण

Next Post

कुसुंबा परिसरातून १६ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

कुसुंबा परिसरातून १६ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
1xbet russia

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon