शहर पोलीस स्टेशनची तार ऑफिसजवळ कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यात २ तरुणांकडून त्यांच्या कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव ढमाले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तार ऑफिसजवळील एका हॉटेल जवळ पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा होता.(केसीएन)त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्याच्या अंगझडतीत १ गावठी कट्टा व ४ जिवंत काडतूस मिळून आले. तरुणाने त्याचे नाव ऋतिक उर्फ गोलू भगवान निंदाने (वय २४, रा.वाल्मिक नगर भुसावळ) असे सांगितले. तसेच तो आणखी एका तरुणाची वाट पाहत होता. पोलिसांनी तेथेच थांबून त्या तरुणाची वाट पाहिली व त्याला ताब्यात घेतले.
त्यांने त्याचे नाव सुमित भानुदास सोलसे (वय २५ रा. डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) असे सांगितले. त्याच्याही अंग झडतीतून देखील १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गायकवाड, विनोद नेवे, दीपक कापडणे, जाकीर मंसूरी, दीपक शेवरे, राहुल भोई, भूषण चौधरी, सुबोध मोरे, संजय ढाकणे, गजानन पाटील, राहुल बेनवाल यांनी केली आहे.