चोरटयांनी लांबविला साडेतीन लाखांचा ऐवज
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील शांती नगरातील प.क.कोटेचा महाविद्यालयाजवळील बंद घरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत तीन लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला. भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी एकूण १०२ ग्रॅम वजनाचे साडेतीन लाख रुपये मूल्याचे सोन्याचे दागिने लांबवले आहे.
भगवान साहेबराव पाटील (वय ३४, सिद्धीविनायक अपार्टमेंटमागे, शांती नगर, भुसावळ) हे सरकारी नोकरदार आहेत. दि. ३० एप्रिल पाटील कुटूंब बाहेरगावी गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी स्टीलच्या डब्यातील एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.