भुसावळ शहरात दांपत्याला अटक, डीवायएसपी पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरामध्ये माइंड अँड बॉडी स्किन केअर स्पा या बॅनरच्या नावाखाली महिलांकडून देह विक्री व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या ठिकाणहून राज्यातील विविध भागातल्या पाच महिलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात माइंड अॅण्ड बॉडी स्किन केअर स्पा या नावाखाली कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. कृष्णात पिंगळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सपोनि रुपाली चव्हाण, सपोनि सुदर्शन वाघमारे, मसफौ वलके, सफौ/ प्रदिप पाटील, मपोहेकॉ/ अश्विनी जोगी, पोहेकॉ/ अनिल झुंझारराव यांचे सहाय्याने सदर ठिकाणी दोन पंच व पंटरसह व पंचनाम्याचे साहित्यासह जावुन सव्वा पाच वाजता छापा टाकला.
देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम ब-हाटे (वय ३८) व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे (वय ३९, दोन्ही रा. महेश नगर, भुसावळ) व देह व्यापार करणा-या पिडीत पाच महिला करमाळा, जि. सोलापुर, ह.मु. मगरपट्टा पुणे, जामखेड, जि. अहमदनगर, पहुर, ता. जामनेर, जि. जळगांव, पिंपरी चिंचवड, पुणे, कुलाबा, मुंबई येथील राहणा-या व दोन इसम मिळुन आले आहेत.
सदर ठिकाणी देह व्यापारास लागणारे साहित्य मिळुन आले आहे. सदरचे ठिकाण हे रहीवाशी वस्ती मधिल असुन ब-हाटे पती पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व महिलांना पैश्याचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करून घेत होते. अश्या प्रकारचे अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य करणारचा इसमा विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.