• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरालगत असलेल्या मिलिटरी स्टेशन कॅम्पसच्या मागे आणि झेडटीआरआय (ZTRI) बोगद्याजवळ एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भुसावळ ते खंडावा डाऊन रेल्वे लाईनला लागून असलेल्या कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड व टणक वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या केली. सोमवारी (२९ जून) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण भुसावळ शहर आणि रेल्वे परिसरात कमालीची घबराट पसरली आहे.

मृत संतोष मंचल हे गेल्या ६ ते ७ वर्षांपासून कालिका माता मंदिराच्या आवारातील एका पत्राच्या खोलीत राहत होते आणि तिथल्या तीन मंदिरांची देखभाल, स्वच्छता व पूजा-अर्चा करत असत. ते केवळ जेवणासाठी घरी जात असत. मृत संतोष मंचल यांना दररोज दारू पिण्याचे व्यसन होते आणि त्या अनुषंगाने घरात भांडणे देखील होत असत, अशी माहिती त्यांच्या दोन्ही मुलांनी दिली आहे.

सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा एक व्यक्ती मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेली, तेव्हा त्यांना मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या खोलीपाशी संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने जबर प्रहार करून त्यांना जागीच ठार केले होते. यानंतर तात्काळ पोलिसांच्या ‘११२’ क्रमांकावर कॉल करून या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पूजार्‍यांचे कुटुंबीय देखील मंदिरात पोहोचले, तेथे संतोष यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उप पोलीस अधीक्षक केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात रवाना केला.

या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून हा खून चोरीच्या उद्देशाने झाला, जुन्या वैमनस्यातून झाला की घरगुती वादातून, याचा शोध पोलीस घेत आहेत. खुनाचा छडा लावण्यासाठी जळगाव येथून तातडीने ठसे तज्ज्ञ (Fingerprint Experts) आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी एलसीबी आणि भुसावळ शहर पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून ‘पोलीस तपासात लवकरच सत्य बाहेर येईल’ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-29-at-14.21.51.mp4

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

Next Post

डांगर शिवारातील मोबाईल टॉवरवर चोरी; बॅटरीसह ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

डांगर शिवारातील मोबाईल टॉवरवर चोरी; बॅटरीसह ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

डांगर शिवारातील मोबाईल टॉवरवर चोरी; बॅटरीसह ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

June 29, 2026
भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
1xbet russia

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

डांगर शिवारातील मोबाईल टॉवरवर चोरी; बॅटरीसह ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

June 29, 2026
भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!