रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर बाहेरगावी असताना चोरट्यांचा डल्ला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील गोदावरी कॉलनी परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत २० हजार रुपये किमतीचा ३२ इंची एलजी कंपनीचा एलसीडी टीव्ही चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राघवेंद्रसिंग लालसाहेब सिंग (वय ३५, व्यवसाय रेल्वे नोकरी, रा. आर.बी.-II, ६०६ बी, गोदावरी कॉलनी, भुसावळ) हे रेल्वेच्या ड्युटीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते २६ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान त्यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले.
चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या स्टोअररूममध्ये मांडणीवर ठेवलेला एलजी कंपनीचा ३२ इंची काळ्या रंगाचा एलसीडी टीव्ही, अंदाजे २० हजार रुपये किमतीचा, चोरून नेला.
दरम्यान, फिर्यादी १५ सप्टेंबर रोजी घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ भुसावळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास GPSI अनिल तुकाराम सुरवाडे करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









