भुसावळ : घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडलेला चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी न परतल्याने बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका परिसरात चौदा वर्षीय मुलगा वास्तव्यास आहे. दि. १० रोजी रात्री नऊ वाजता खेळण्यासाठी बाहेर पडला मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी न आल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. मात्र मुलाबाबत काहीही तपास न लागल्याने त्याचे अपहरण झाल्याची खात्री झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.