भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोजोरे गावात नातेवाईकांकडे आलेली पिंपळगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि.१२ जुलै रोजी समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी ही दि. १२ जुलै रोजी भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावातील नातेवाईकांकडे आलेली असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी गुरूवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.