जळगाव ;- भुसावळ शहरातील एका ५० वर्षीय व्यापाऱ्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी येथे घडली असून यामुळे भुसावळात खळबळ उडाली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सिंधी काॅलनी जवळील लेंडीपुरा भागात राजकुमार नामक सिंधी व्यापाऱ्याकडे काल्या नामक व्यक्ती येऊन त्याने वस्तू घेतल्यानंतर पैशांच्या कारणावरून काल्या नामक याने राजकुमार आगीचा यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ५ वाजेच्या सुमारास येथे घडली . त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .