चाळीसगावात भाजप आमदारांकडून फिजिकल डिस्टसिंगचा उडाला फज्जा
जळगाव (प्रतिनिधी)- भाजपच्या जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्यासह माजी मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी जमाव बंदी आदेशाचे व फिजीकल डिस्टसिंगचे उल्लंघन केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे. आज सकाळी 11 ते 11.30 वाजेच्या दरम्यान भाजपच्या आमदार, खासदारांनी व माजी मंत्र्यांनीही आपापल्या समर्थकांसह फोटो सेशनकरीता गर्दी करून जमाव बंदी व फिजीकल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर बसवून तसेच छायाचित्रही सोशयलमिडीयावर झळकवले. जमाव बंदीचा नियम हा केवळ सामान्य जनतेलाच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी नियमांचे उल्लंघन करणार्या लोकप्रतिनिधींवर कराव्यात अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
चाळीसगावात भाजप आमदारांकडून फिजिकल डिस्टसिंगचा उडाला फज्जा
महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आज राज्यात भाजपने ठिकठिकाणी घोषणाबाजी करून निदर्शने केली . मात्र चाळीसगावातही भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला . मात्र जमाव बंदीचे आदेश असताना पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते दिसून आले . तसेच फिजिकल डिस्टसिंगचे पालनही करण्यात आले नसल्याने सर्वसामान्यांना एक तर राजकीय प्रतिनिधींना दुसरा न्याय असा प्रश्न सामान्य जनतेत निर्माण झाला आहे . कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे .