नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अटल बिहारी वाजपेयी टनेल (बोगदा) चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी हा दिवस ऐतिहासिक आहे. आज केवळ वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तर हिमाचल प्रदेशमधील कोट्यवधी नागरिकांची प्रतीक्षा संपली आहे, असे त्यांनी सांगितले हे.


माहितीनुसार, २००२ साली अटलजींनी या बोगद्याचे पायाभरणी केली होती. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. २०१३-१४ बोगद्याचे काम केवळ १३०० मीटर पूर्ण झाले होते. यानुसारच काम सुरु राहिले असते तर अटल बोगद्याचे काम २०४० साली पूर्ण झाले असते. परंतु, २०१४ नंतर अटल बोगद्याचे वेगाने काम करण्यात आले.
विकासाच्या मार्गावर वेगवान वाटचाल करण्यासाठी तसेच देशातील जनतेला विकासाची तीव्र इच्छा असेल तर कामाचा वेग वाढवायचा असतो. २०१४ नंतर आमच्या कालखंडात २६ वर्षांचे रखडलेले काम केवळ सहा वर्षात पूर्ण करण्यात आले.
या बोगद्यामुळे मनाली आणि केलाँग दरम्यानचे अंतर ३-४ तासांनी कमी होईल. ३-४ तासांचे अंतर कमी होण्याचा काय अर्थ होतो हे येथील भाऊ व बहिणी समजू शकतात. येथील पायाभूत सुविधा सुधारण्याची नेहमीच मागणी होत आहे. परंतु अनेक वर्षांपासून सीमेशी जोडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजन टप्प्यातून बाहेर येऊ शकले नाहीत किंवा ते अडकले अथवा भटकले, असेही मोदींनी म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले कि, ज्याच्या मेहनतीने हे सर्व शक्य झाले असे लोक लोकार्पणच्या झगमगीत कार्यक्रमात मागे राहतात. परंतु, या महान यज्ञात घाम गाळून आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या सर्व सैनिक, अभियंता, कामगार बंधू-भगिनींना मी आदरांजली वंदन करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अटल बोगदा प्रकल्प पूर्ण करणे हे ‘बीआरओ’साठीही मोठे आव्हानात्मक काम होते. बोगद्यामुळे भारत-चीन हद्दीपर्यंत अनेक किमींचे महामार्ग जाळे फार उपयुक्त ठरणार आहे. सध्या लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन तणाव असताना, हा बोगदा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे सुरक्षा बल, त्यांचे साहित्य लडाखच्या हद्दीपर्यंत कमी वेळात पोहोचू शकेल आणि चीनबरोबर लढण्याची क्षमतादेखील वाढवू शकणार आहे. अटल बोगद्यामुळे मनाली आणि किलॉंगमधील 45 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास 12 हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा आहे, ज्याच्या निर्मितीसाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे.सर्वसामान्य नागरिकांबरोबरच हा बोगदा सैन्य दल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे. अटल बोगदा सर्वार्थाने लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.







