जळगाव (प्रतिनिधी) – शहरात साफसफाई होत नसल्याचा व रोगराई पसरत असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपने आंदोलन केले होते , या आरोपाला उत्तर देत शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी रस्ता झाडत आज कृतीतुन प्रत्युत्तर दिले.
काल गणरायाच आगमन झालं. महानगरपालिकेतर्फे शहरातील अनेक ठिकाणी गणपतीच्या पूजेचे साहित्य तसेच मुर्त्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. आज सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी अशा ठिकाणांवर जाऊन स्वतः रस्ते झाडले .ज्या ठिकाणी गणपती मूर्त्यांचे स्टॉल होते. त्या ठिकाणी महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सफाई केली.
पूजा, फुल विक्रेते केळीचे पान, पूजा साहित्य, फुले त्याच ठिकाणी सोडून निघून जातात. या सर्व नाशवंत वस्तू असून शहरात घाण आणि रोगराई पसरू शकते म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली सकाळी 6 वाजता त्यांनी स्वच्छतेला सुरवात केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला भाजप केवळ आरडाओरड करते शिवसेना मात्र त्याला कृतीने उत्तर देते त्यानुसार महापौर यांनी आज काम केले अशी चर्चा होते आहे.
शहरात आकाशवाणी चौक, बळीराम पेठ , टॉवर चौक , अजिंठा रोड व चौफुली या ठिकाणी गणपती मूर्ती विक्री करण्यात आली होती त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली.