पारोळा ;- गेल्या 23 मार्च पासुन संपूर्ण देशात लाँकडाऊन जारी करण्यात आला आहे.या पाश्वभुमीवर तालुक्यात देखील प्रशासनाची करडी नजर आहे.रात्रंदिवस काम करित असतांना मात्र काल ता,22 रोजी पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांना छातीत दुखल्याचा त्रास जाणवु लागला.त्यांनी तात्काळ डाँ हर्षल माने यांच्याकडे तपासणी केली. पोलिस कर्मचारी, पत्रकार,होमगार्ड व स्वयंसेवक,सेवानिवृत्त आर्मी कर्मचारी यांची देखील तपासणी केली जावी.अशी संकल्पना त्यांनी डाँ माने यांच्याकडे मांडली.त्यास दुजोरा देत ता,23 रोजी कृष्णा हाँस्पीटल येथे तब्बल 250 च्यावर सर्वांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली.विशेष म्हणजे इसीजी व सर्वच तपासणी ही डाँ माने यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विमामुल्य केल्याने सर्वांनी त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे मनापासुन आभार मानले.
तपासणी कँम्प यशस्वीतेसाठी डाँ दिपाली माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश पाटील,कौतीक पाटील,संदीप पाटील,आबा पाटील,अक्षय चव्हाण,सुनिल पाटील व आकाश पाटील यांनी सहकार्य केले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन ही आपली भुमिका प्रामाणिक पणे सांभाळीत आहे.आपण देखील समाजाचे देणे लागतो.व अश्या कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासली जावी हा हेतु ठेवत ही वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
डाँ हर्षल माने( कृ्ष्णा हाँस्पीटल,पारोळा )
जि प सदस्य,जळगांव