चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील घटना
सदानंद चौधरी हे दुचाकीने (एमएच १९ डीई ०६५५) धुळे रोडने बसस्टँडकडे जात असताना त्यांच्या मागून येणाऱ्या शहादा-छत्रपती संभाजीनगर बसने (एमएच २० बीएल ३१०९) जोरात धडक दिली. दुचाकीचालकाला रोडवर फरफटत नेल्याने दुचाकीचालक सदानंद मधुकर चौधरी यांच्या डोक्याला, हातास व पायास गंभीर दुखापत झाली. रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने जखमी चौधरी यांनी प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे पाठविण्यात आले.
याप्रकरणी शहर पोलिसात पोहेकॉ अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून बसचालक रामदास दंगल खैरनार (४४, वलवाडी, धुळे) यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सदानंद चौधरी हे भाजपाचे शहर उपाध्यक्ष व तेली युवक महासभेचे नाशिक विभागीय अध्यक्ष आहेत.