शिरसोली ( प्रतिनिधी ) – बारी समाज विद्यालय येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी-शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर सर हे होते. प्रभारी पर्यवेक्षक श्री एस ए भदाणे ज्येष्ठ शिक्षक श्री आर के पाटील, बी.आर बारी, डी. जी कुलकर्णी, सी. एस.कुमावत ए. टी. बावस्कर श्रीमती एस.पी दुबे मॅडम जी बी काळे एस के काटोले संभाजी अस्वार सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.दिशा काथार या विद्यार्थिनीने केले तर सूत्रसंचालन जान्हवी काटोले, पायल तायडे दुर्गा गवळी या विद्यार्थिनीनी केले.
प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर सर व मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. दहावीतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी- शिक्षक दिवस साजरा करताना त्यांना आलेले अनुभव डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले यात कु.पायल बारी हिने शाळेची एक दिवसाची मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली.तिने आपल्या मनोगतातून मुख्याध्यापकांचे कार्य, विद्यार्थी- शिक्षकांना सांभाळणे, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करणे शाळेची जबाबदारी यावर आपले विचार मांडले. भूमिका पाटील या विद्यार्थिनीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर के पाटिल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आई वडील हेच आपले प्रथम गुरु यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर सर यांनी शिक्षक दिन याप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जीवनगाथा बालपण, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य शिक्षकांपासून तर राष्ट्रपती पर्यंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेले महान कार्य याबद्दल विद्यार्थांना आपल्या विचारातून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर बारी या विद्यार्थ्याने केले.