जळगाव (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर हे होते त्यांनी प्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले सांस्कृतिक प्रमुख श्री डी जी कुलकर्णी यांनी अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री जी बी काळे यांनी केले विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले यामध्ये गायत्री काटोले नियती अस्वार या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक यांच्या बालपणीच्या जीवनाच्या आठवणी त्यांचे शिक्षण त्यांनी सुरू केलेले उत्सव चतुसूत्री कार्यक्रम याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तेजस बारी समर्थ पाटील भूमिका पाटील पवन बारी स्नेहल बारी या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. श्री डी जी कुलकर्णी सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य फकीरा कादंबरी लालबावटा कला पथकाची स्थापना रशियातील त्यांचे प्रवास वर्णन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर सामाजिक कार्या विषयी राजकीय कार्याविषयी केसरी व मराठा वृत्तपत्र मधून लोकांची जनजागृती याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक श्री एस एम ताडे डी के पाटील मॅडम पिंजारी मॅडम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेत्रा वाणी मॅडम यांनी केले.