• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) — मेहरूण तलाव परिसरात जळगाव– पाचोरा रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर रस्ता बंद करून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. या ठिकाणाहून जाण्यास मज्जाव केला असता दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. वाघनगर येथील दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गणपती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. लेक रेसिडेन्सीजवळ विसर्जनासाठी जाणार्‍या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात येऊन या ठिकाणी बॅरिकेट्स उभे करून रस्ता बंद करण्यात आला होता. याठिकाणी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पो कॉ योगेश ठाकूर तसेच नागपुरातील महामार्गचे दिनेश माकरवार या दोन जणांना बंदोबस्तावर तैनात करण्यात आले. दुपारी राजेंद्र वाजपेयी हे त्यांची पत्नी एकता वाजपेयी हिच्यासोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ डी.आर. ७०२३ )वरून जात होते. लेक रेसिडेन्सी जवळ लावलेले बॅरिकेड्स बाजूला करून ते जाण्याचा प्रयत्न करत असतांना बंदोबस्तावरील योगेश ठाकुर यांनी वाजपेयी दाम्पत्याला मनाई केली . याचा राग आल्याने राजेंद्र वाजपेयी यांनी योगेश ठाकूर यांची कॉलर पकडून छातीत बुक्का मारला व शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी राजेंद्र वाजपेयी यांची पत्नी एकतासुद्धा पायातील चप्पल काढून पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन आली. योगेश ठाकूर यांच्यासोबत असलेले दिनेश माकरवार यांनी वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन स्थितीत नव्हते. याचवेळी गस्तीवरील शहर वाहतूक शाखेचे वाहन जात होते त्यांनीही वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघेही ऐकून घेण्याच्या भूमिकेत नसल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत दाम्पत्याला ताब्यात घेत वाहतूक शाखेचे वाहनातुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. पो कॉ योगेश ठाकुर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र वाजपेयी व एकता वाजपेयी या दाम्पत्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील ‘धोरावीरा’ मनमोहक शहर

Next Post

खोटे दस्तावेज तयार करून आर्थिक फसवणूक ; पोलीसात ७ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खोटे दस्तावेज तयार करून आर्थिक फसवणूक ; पोलीसात ७ जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon