नागपूर ( प्रतिनिधी ) – नागपूर जिल्ह्यातून सातत्याने अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बुधवारी देखील वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत परिसरातील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने झोपडपट्टीत राहणाऱ्या युवतीचे अपहरण करून तिला वर्धा शहरात नेले. तेथे एका खोलीत तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. याला विरोध केला असता त्याला मारहाणही केली. पीडितेने नागपुरात परतल्यानंतर वाठोडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता (21 रा. वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि पीडित दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 31 मे रोजी वाठोडा पोलिस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी मुलीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचून मुलीची सुटका केली. मात्र, त्यादरम्यान आरोपी तेथून फरार झाला.
आरोपीने 20 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढले. तो तिच्या आई – वडिलांसमोर तिच्या प्रेमाची मागणी करत होता. 31 मे रोजी विशालने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. ती न आल्याने त्याने तिला बळजबरीने चौकातून वर्धा येथे दुचाकीवर नेले. प्रथम मुंबईला नेल्याचे निष्पन्न झाले. तेथे पाच दिवस ठेवल्यानंतर त्यानी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नेले. जिथे त्याने एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीनी अनेक दिवस शोषण केले.
तीन दिवस बलात्कार केला. याची वाच्यता केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली. मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलीला संधी मिळताच ती वर्धा सोडून नागपुरात परतली. या प्रकरणी मागील दोन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.