जळगाव तालुक्यातील बोरनार येथे झाली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरनार येथून शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री एका पशुपालकाच्या बकऱ्या चोरणाऱ्या चौघा तरुणांच्या मुसक्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारी दि. ९ रोजी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनील राजेंद्र बडगुजर (वय ३२, रा. बोरनार ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या खळ्यातील २ बकऱ्या ह्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्या होत्या. एमआयडीसी पोलिसांनी माहिती काढली असता, संशयित आरोपी हे पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील असल्याचे समजले.(केसीएन) त्यानुसार सुरुवातीला आकाश प्रकाश भिल (वय १८, रा. कासमपुरा ता. पाचोरा) याला ताब्यात घेतले. त्याला सखोल विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन आणखी तिघांची नावे सांगितली.
त्यानुसार पोलिसांनी जितेंद्र सुपडू भिल (वय २०), सुनील सुखराम भिल (वय २१), सचिन युवराज भिल (वय २०, सर्व रा. सामनेर ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली आहे.(केसीएन) त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांनी आणखी कोणते गुन्हे केले आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई हि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रदीप पाटील, हेकॉ स्वप्नील पाटील, डॉ. मनोज पाटील, कैलास पाटील यांनी हि कारवाई केली आहे.