छाया किडनी फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन, आनंद डायलिसीसचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – अवयव दान, देहदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जागतिक अवयवदान दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर छाया किडनी फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन व आनंद डायलिसीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील अवयव दात्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीस सुखकर्ता फौंडेशनचे संचालक डॉ. नरेंद्र ठाकूर व आनंद डायलिसीस व किडनी सेंटर जळगावचे संचालक डॉ. अमित भंगाळे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना अवयवदानाची प्रतिज्ञा पत्र प्रदान केले. कार्यक्रमाची सुरुवात छाया किडनी फौंडेशनचे संचालक किशोर सुर्यवंशी यांनी लिहिलेल्या व रचलेल्या अंगदान गीत गाऊन करण्यात आली. ज्यांनी जिवंतपणी आपली किडनी, यकृत आपल्या नातेवाईकांना किंवा जवळील व्यक्तीला दान केलेले आहे असे अवयव दाते, व्यक्ती निधन पावल्या नंतर त्याच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे केलेले देहदान किंवा नेत्रदान अशा परिवारातील सदस्यांना सदर कार्यक्रमात सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे देहदानाचा संकल्प केला आहे अशा व्यक्तींचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक व्यक्तींचा यात समावेश होता.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी समाजातील अश्या सकारात्मक बाबी जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले . सुखकर्ता फाउंडेशन , छाया किडनी केअर अँड रिलीफ फाउंडेशन , आनंद हॉस्पिटल आणि डायलेसिस सेंटरचे कार्य प्रेरणादायी व कॊतुकास्पद आहे असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे अधिष्ठाता व आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ .गिरीष ठाकूर ह्यांनी केले.
राजेश यावलकर, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. राजेश दाबी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेंदासनी, आर्यन फौंडेशनच्या संचालिका डॉ. रेखा महाजन, मांगीलाल बाफना नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख डॉ. धमेंद्र पाटील, पारोळा येथील नेत्रदान व देहदान विषयी कार्य करणाऱ्या डॉ. राजकुमारी जैन आणि मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा ह्यांची उपस्थिती होती. सूत्र संचालन लीना लेले व हर्शल पाटील यांनी केले तर सजावट व तांत्रीक बाजू मुसा शेख, निकिता चौधरी, स्वरित सुर्यवंशी यांनी सांभाळली. सदर कार्यक्रमासाठी उडान फाउंडेशनच्या हर्षाली चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.