जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी भागात विनापरवाना देशी विदेशी दारूची कारमधून वाहतूक करणाऱ्या कारचालकाला मुद्देमालासह एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमाल व कार हस्तगत करण्यात आली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हॉटेल कस्तूरीजवळ कारमधून बेकायदेशीर देशी विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच ०२ जेपी ००७१) मधील कार वाहनाची तपासणी केली असता वाहनातून १२ हजार ४८० रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. कारचालक राजेंद्र पुंडलिक चांदेकर (वय-५६) रा. सुतार गल्ली, तोंडापूर ता.जामनेर याला अटक केली असून कारसह देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस कॉस्टेबल विजय बावस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स.फौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सचिन पाटील, योगेश बारी, विजय बावस्कर यांनी कारवाई केली.