
महिलेच्या तक्रारीनुसार जबरदस्तीने नेऊन अत्याचार केल्याचा दावा; पोलीस तपास सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी तसेच शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार ती रस्त्याने पायी जात असताना आरोपींपैकी दोघांनी तिला जबरदस्तीने दोरीने बांधून वाहनातून जवळील ओढ्याजवळ नेले. तेथे चार जणांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७०(१), ६४, ६४(२) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या परिचयातील असल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच आरोपींपैकी एकाचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय असून, पीडितेच्या पतीकडे ट्रॅक्टर भाड्याचे सुमारे एक लाख रुपये थकीत असल्याची माहितीही पोलिसांकडून तपासात पडताळली जात आहे. या माहितीचा गुन्ह्याशी संबंध आहे किंवा नाही, याबाबत कोणताही निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नसून तपास सुरू आहे.
पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.









