भुसावळ : लग्नाचे अमिष दाखवित तालुक्यातील ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच महिलेला आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरलची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून दीपनगर प्रकल्पातील एका विभागातील अभियंत्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भुसावळ तालुक्यातील ३८ वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत हार्दिक हेमचंद्र सोनी (दीपनगर, ता. भुसावळ) यांनी दि. ५ डिसेंबर २०२१ ते दि. ६ जून ई २०२४ दरम्यान लग्न करण्याचे आमिष र दाखवून वेळोवेळी अत्याचार केला तसेच अनैसर्गिक अत्याचार केला व पीडीतेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. पीडीतेने तालुका पोलिसात आरोपी हार्दिक सोनी विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संशतियाचा शोध घेत आहेत.