जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या दूध फेडरेशन समोर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतीमध्ये आज २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अरविंद हरीप्रसाद शहा (वय-२६)असे मयत तरूणाचे नाव आहे.
आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. परिसरातील नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मयत घोषीत केले. डॉ. सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोओमप्रकाश सोनी करीत आहे.