• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेग; जळगाव मनपाचे ४२ कोटी ६० लाख रुपये थकीत

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित बहुचर्चित ‘अटलांटा’ प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी राजहू ए. बॅरोट यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असला, तरी त्यांच्यावर अत्यंत कठोर अटी लादल्या आहेत. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय आरोपीला देशाबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप: या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने जळगाव महानगरपालिकेची बाजू भक्कमपणे मांडली. १९९६-९७ ते २००१-०२ या कालावधीत अटलांटा लिमिटेड कंपनीला विविध रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ‘मोबिलायझेशन’ आणि ‘मटेरियल अॅडव्हान्स’ देण्यात आला होता. मात्र, कामांमधील अनियमितता आणि अपूर्ण कामांमुळे व्याजासह तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपये महापालिकेकडे येणे बाकी असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. हा जनतेच्या कराचा पैसा असून त्याचा अपहार झाल्याचा दावा करण्यात आला.

नगरसेवक अरविंद देशमुख यांचा यशस्वी पाठपुरावा: अटलांटा प्रकरणाला कायदेशीर वळण देण्यात नगरसेवक अरविंद देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. त्यांनीच सर्वप्रथम जळगाव शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फौजदारी तक्रार दाखल केली होती. महासभेत आणि प्रशासकीय स्तरावर आक्रमक भूमिका घेत त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. जनतेच्या कष्टाच्या पैशांची वसुली व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या तक्रारीनंतरच महानगरपालिका प्रशासनाने विशेष लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

न्यायालयाच्या कडक अटी: न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नमूद केले की, हा वाद करार आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. संपूर्ण प्रकरण कागदोपत्री पुराव्यांवर आधारित असल्याने आरोपींना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जामीन मंजूर करताना न्यायालयाने खालील अटी घातल्या आहेत:

देशाबाहेर जाण्यास बंदी: न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपीला भारत सोडता येणार नाही.

तपासात सहकार्य: तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यास हजर राहणे बंधनकारक.

माहिती देणे अनिवार्य: आरोपीला आपला राहता पत्ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागेल.

पुराव्यांशी छेडछाड न करणे: कोणत्याही प्रकारे पुराव्यांमध्ये फेरफार करण्यास मनाई.

अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी, देश सोडून जाण्यावर आलेली बंदी आणि तपासाची सक्ती यामुळे अटलांटा प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

Next Post

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon