राज्य शासनाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – वर्धा येथील निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांची जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीपदी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने बुधवारी २० सप्टेंबर रोजी नियुक्ती केली आहे.
याबाबतचे आदेश परिपत्रक जारी झाले आहे. प्रशासकीय कारणास्तव सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परिपत्रकावर शासनाचे सहसचिव ज. अ. शेख यांची स्वाक्षरी आहे.