जळगाव तालुक्यातील विटनेर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील विटनेर येथे नेरीकडून म्हसावदकडे जाणा-या केमिकल टँकरने रस्त्यावरून जाणाऱ्या म्हशीसह शेतकऱ्याला धडक दिल्याची घटना विटनेरजवळ रस्त्यावर घडली आहे. या भीषण अपघातात शेतक-यासह व एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरी जायबंदी झाली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सुकलाल सोनवणे (वय-५०) असे मयत शेतक-याचे नाव असून घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने सुमारे तीन तास वाहतुक अडवुन् धरली. जळगाव तालुक्यातील नेरी- म्हसावद रस्त्यावर विटनेर या गावात अनेक शेतकरी व पशुपालक राहतात, आज दि.१९ रोजी दुपारच्या सुमारास म्हशी चारवून घरी येत असतांना सायंकाळी विटनेर गावाजवळ केमिकल्स ने भरलेल टँकर(जी.जे.१२. बी.व्ही.७४७५) ने भरधाव वेगाने येत असताना रस्त्याने जाणाऱ्या म्हशीसह सुकलाल पंडित सोनवणे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक म्हैस गंभीर जखमी आहे.
या घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुमारे तीन तास रस्त्यावर ठिय्या दिल्याने वाहतुक पुर्णतः ठप्प झाली होती. या रस्त्यावर नेहमीच असे छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसासह वरीष्ठ अधीकारी दाखल झाले आहे.