उमाळा नशिराबाद रोडवरील घटना ; वाहनाचे हजारोंचे नुकसान
जळगाव(प्रतिनिधी ) ;- उमाळा -नशिराबाद रस्त्यावरील एका पीव्हीसी पाईपच्या कंपनीतून आयशर गाडी क्र.( एम.एच.-19, सि. वाय.-6385) पीव्हीसी पाईप भरून उमाळा नशिराबाद रोडने ममुराबादकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीच्या चालकाने रस्त्यातील खड्डा वाचविण्याचा प्रयत्न करत होता.तर आयशर ट्रक चालकाने दुचाकीचालकाला वाचविण्याचा प्रयत्नात आयशर चालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटल्यानेवाहन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास उमाळा- नशिराबाद रस्त्यावर घडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाल्याची माहिती आयशर गाडीचे मालक लोकेश जोशी यांनी दिली.