भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ रात्री घडली घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कामगार शनिवारी दि. २० जुलै रोजी रात्रीच्या वेळी कामावरून घरी वरणगावकडे मोटर सायकलवरून येत असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक जबर धडक झाली. यात तरुण ठार झाल्याची घटना रात्री बारा वाजेच्या दरम्यान कपील नगर जवळ घडली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादाराव नारायण जमधाडे (वय ३६, रा. मुळ मन्यारखेडा व ह.मु. वरणगाव,वामन गुरुजी नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो दिपनगर औष्णीक विज केंद्रातील एका कंत्राटदाराकडे कामाला होता. (केसीएन)दि. २० रोजी दुपारी ४ ते १२ वेळेत काम करून सुट्टी झाल्यानंतर रात्री घरी वरणगावकडे मोटर सायकल क्र (एमएच १९ एएच ४७९३) ने जात होता. दरम्यान त्याच बाजूने दुसरी मोटर सायकल क्र (एमएच १९ डीए ७९२६) ही भुसावळला जात असताना कपील नगरच्या समोर दोन्ही मोटर सायकली समोरासमोर जोरदार धडकल्या.
या अपघातात दादाराव जमधाडे हा जमीनीवर कोसळल्याने डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. (केसीएन)याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला दिपक नारायण जमधाडे यांच्या खबरी वरून भुसावळ येथील साजीद अहमद (पुर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.